Love U Jindagi

 नमस्कार 

        मित्रांनो मी  आज पासून ब्लॉग लिहायला सुरुवात केली . लव्ह यू जिंदगी  या नावाने कारण  जीवन हे देवाने दिलेली एक सुंदर देणगी  आहे. असे माझे मत  आहे .मत असे मी  म्हणालो कारण मी या ३० वर्षा  खुप काही शिकलो आहे .आणि शिकत पण आहे . काही जण या जीवनाला कंटाळलेले लोक आपल्याला या जगात भेटतील पण मला त्यांना असे सांगायचे आहे की त्या मिळालेल्या  जीवनाला कंटाळ्यान्याला आपणच कारण असू शकतो . आणि आपण देवाला व नशीबाला  नाव ठेवत  बसतो. 

           मी तर म्हणतो कि आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला माहित असतं का हो आपल्यावर लहानपणी वा मोठेपणी जीवनाला कंटाळण्याइतके वेळ आपल्यावर येईल . ती जर येणार आहे हे आदी माहित असते तर आपण जन्माला आलो असतो का ? पण जन्माला येणे  तर हे आपल्या हातात नाही . आणि आपण ते थांबवू पण शकत नाही . मग आपण का नशिबाला दोष द्यायचा . आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्याला येणाऱ्या संकटाला तोंड द्यायची ताकत  आपण घेऊन आलेलो असतो . पण आपण ती ओळखु शकत नाही . 

जशी  संकट दिले आहे तसे त्यातून  बाहेर पडण्याचा मार्गही असतो .तो मिळतो पण त्या साठी आपल्याला त्याचा साठी तो शोधण्याची गरज असते . आपण जर दुसऱ्यावर जर अवलंबून राहिलो तर तो कधीच मिळत नाही. म्हणून या युगात आपल्याला मार्ग काढणे महत्वाचे आहे. 

म्हणून  या दिलेल्या जीवनाला न घाबरता जगायला शिका आणि जो शिकला तो टिकला असे म्हणतात . म्हणून  म्हणतो  लव्ह यू जिंदगी मित्रानो. 

माझा ब्लॉग आवडला असेल तर कंमेंट बॉक्स मदे नक्की सांगा आणि काही सांगायचे असेल तर ते हि सांगा . 

                                                                                                                           आभारी आहे. 




Comments

Popular posts from this blog

Investing india

Love U Jindagi☺

Love U Jindagi